MH 13 NEWS Network
भाजपच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विकासाच्या मुद्द्याचं बोला, वीस वर्षात कामे झाली नाहीत असा आरोप महेश कोठे यांनी नाव न घेता केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची गुरुवारी सकाळी भाजपचा बाले किल्ला असलेल्या प्रभाग आठ येथून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, ठिकठिकाणी महेश कोठे यांचा नागरिकांकडून सत्कार करण्यात आला, अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून महेश कोठे यांचे स्वागत करण्यात आले, शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून महेश कोठे यांना मोठया प्रमाणात पाठींबा मिळत आहे.
पदयात्रेत हजारो स्त्री-पुरुष नागरिकांचा समावेश..
शहर उत्तर मधील उमेदवार महेश कोठे यांच्या पदयात्रेस प्रतिसाद वाढतच असून भाजपाच्या बालेकिल्ल्यात हजारो स्त्री-पुरुष नागरिकांचा समावेश कोठे यांच्या समवेत होता.
पदयात्रेस दत्त चौक येथून सुरुवात होऊन माणिक चौक, विजापूर वेस, बारा इमाम चौक, सोमवार पेठ, शंकरलिंग मंदिर, साखर पेठ, औद्योगिक बँक, कन्ना चौक मार्गे काढून कौतम चौक येथे समारोप करण्यात आला.
गेल्या वीस वर्षांत विकासकामे न झाल्याने मालकांचे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम करत असून विकासाच्या मुद्यावर कोणीलाही बोलता येत नाही, त्यामुळे यंदा शहर उत्तर मध्ये परिवर्तन अटळ असून यंदा शहर उत्तर मध्ये तुतारी वाजणार असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.
यावेळी उदय चाकोते, संजय शिंदे, राजू कुरेशी, प्रथमेश कोठे, सरफराज शेख,राहुल वैद्य, प्रवीण वाले ,सुलेमान चामाकोरा, कुमुदअंकाराम, भीमाशंकर आकारम, राहुल बालिंगल, रतन खैरमोडे, विश्वनाथ गोयल, संजय अंजीखाणे, सुदर्शन खैरमोडे, राकेश पुंजाल, साई बिर्रु, राजेश कमटम, अमर गट्टी, गिरीश कोटा ,सरफराज शेख, नलामंदू, शशिकांत कैंची, विवेक कन्ना, महेश बटगिरी, सिद्धेश्वर आंबट, गफूर शेख, दत्ता शेवाळे, राजू खरमुडे ,सचिन शेवाळे ,संजय गायकवाड, जावेद कोतकुंडे, प्रमोद मोकाशी, केदार वनारोटे,
यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते