MH 13 NEWS NETWORK
हद्दवाढ भागाच्या विकासासाठी जनता आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत…
हद्दवाढ भागाच्या विकासासाठी जनता आ. सुभाष देशमुख यांचेसोबत
सोलापूर,- शहर दक्षिण पूर्व मंडलमधील हद्दवाढ भागाच्या विकासासाठी आ. सुभाष देशमुख यांनी आजपर्यंत भरीव निधी दिला आहे. प्रभाग क्र. 19 मध्ये रस्त्ो, पाणी, लाईट, पाईपलाईन आदी नागरी सुविधांसाठी बापूसाहेबांनी 22 कोटींपेक्षा जास्त निधी देत या भागाचा चौफेर विकास करत नागरिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिवाय केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत 130 कि.मी.ची भुयारी गटार योजना हद्दवाढ भागातील देसाई नगर ,शांती नगर , विनायक नगर, श्रमजीवी नीलम नगर, आशा नगर, नवले नगर, स्वागत नगर, माळी नगर, ताई चौक, आकाशवाणी परिसर, गवळी वस्ती, नेताजी शाळा, कलप्पा नगर, बोळकोटे नगर , नक्का वस्ती,जमादार वस्ती, नीलम नगर एम आय डी सी इ. भागात 35 कोटी रुपये निधी आ. सुभाष देशमुख यांनी विशेष प्रयत्नाने हद्दवाढ भागासाठी आणला. नलिमनगरसह हद्दवाढ भाग ड्रेनेजलाईन काम प्रगतीपथावर आहे.
पण पक्षातील काही माजी नगरसेवक, कार्यकर्त्ो यांनी आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी आ. सुभाष देशमुख यांचेवर बिनबुडाचे आरोप केले पण विकासासाठी हद्दवाढ भागातील सुजाण मतदार कायमच आ. सुभाष देशमुख यांचे पाठिशी आहे.
प्रभाग 19 मध्ये आ. सुभाष देशमुख यांच्याकडून काही कामं झालं नाही असे कारण देत सोमथन वैद्य यांना या मंडळींनी पाठिंबा दिला आहे. परंत्ुा वस्त्ुास्थिती नाकारत त्यांनी हे आरोप केले आहेत. आमचे त्यांना आवाहन आहे की त्यांनी प्रत्यक्ष येवून काम पाहून मगच बोलावे. सोमनाथ वैद्य यांचा दक्षिणच्या विकासात काहीही सहभाग नाही, सोलापूर भाजपाशी कोणताही संबंध नाही तरी त्यांना आगामी विधानसभेसाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात्ूान उमेदवारी द्यावी यासाठी श्रीनिवास करली, राजश्री अनिल चव्हाण, वरलक्ष्मी श्रीनिवास पुरूड, राजश्री अशोक बिराजदार, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले आदींनी शिफारस दिली. कोणी कोणाला पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. पण स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी 2014 पासून हद्दवाढ भागाचा नियोजपूर्वक विकास केला असून त्याकडे जाणीवपर्वक दुर्लक्ष करत ही मंडळी केवळ स्वतचा सार्थ साधण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी या घटनेची दखल घेत या मंडळींवर कारवाई करावी अशी मागणी हद्दवाढ भागातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. या पत्रकार परिषदेस बसवराज केंगनाळकर, व्यंकटेश कोंडी, नागनाथ शिवसिंगवाले, अर्जुन जाधव, जगदीश नागमल, लक्ष्मण यलदंडी, सतिश माळवे आदी उपस्थित होत्ो