mh 13 news network
विद्यार्थ्यांच्या नाट्य, नृत्यासह संस्कारांचे संमेलन कौतुकास्पद : डॉ. शिवाजी शिंदे
सोलापूर : नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या कला उत्सवात अयोध्या नगरी अवतरली.
विद्यार्थ्यांकडून कलेतून संस्कृती, परंपरेचे दर्शन घडले. वार्षिक स्नेहसंमेलनात यंदा ‘कला उत्सव’ या संकल्पनेतून भारताच्या विविध संस्कृती, परंपरेचे विद्यार्थ्यांनी दर्शन घडवले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे, केंब्रीज युनिव्हर्सिटी प्रेसचे डी.जी.एम. कुणाल ओझर्डे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार करजगी, सचिवा वर्षा विभुते, स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, सल्लागार डॉ. बंडोपंत पाटील, प्राचार्या रुपाली हजारे, प्रि.प्रायमरी इन्चार्ज अन्नपूर्णा अनगोंडा, ज्यू.कॉलेज प्राचार्या स्मिता कुलकर्णी, संस्थेचे ट्रस्टी मेम्बर्स
आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेल्या ‘रामायण ’ या नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम व सीता मातेच्या प्रवासाची कथा प्रभावीपणे मांडली. शिवजन्मोत्सव, स्वराज्य स्थापनेची शपथ , विविध मोहिमा, शिवराज्याभिषेक असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाचे दर्शन श्री शिवाजी महाराज या गाण्यातून बालचमुने घडविले. विद्यार्थ्यांनी तालबद्ध नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ऑर्किडचे स्नेहसंमेलन विविधतेतील एकतेचा संदेश देणारी ठरली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजी शिंदे यांनी हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते संस्कारांचे संमेलन बनले. ते कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन केले. प्राचार्या रुपाली हजारे यांनी वार्षिक अहवालातून माहिती दिली.
या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या मुला समान समजून मी त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असून येणाऱ्या वर्षात इंटर नॅशनल स्कुल उभारून शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यास प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार करजगी यांनी दिली. प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका प्रिसीला असादे यांनी केले.रिदम २०२५ च्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंद लिगाडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दोन दिवसीय स्नेह संमेलनात मोबाईल थीम, स्पोर्ट्स थीम, अण्णा तंगी, मम्मी डॅडी, उद्योगपती रतन टाटा, मंगळागौर , डिस्को डान्स अशा विविध रंगी नृत्याविष्कारातून नाते संबंध, देशप्रेम, संस्कृती, सामाजिक जबाबदारीचे भान, कृतज्ञता या मूल्यांचे दर्शन घडवीत सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.