MH 13 News Network
सोलापूर (प्रतिनिधी) – दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांच्या भावना लक्षात घेण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत आपण २९ तारखेला अर्ज भरू, टायगर अभी जिंदा है, असे म्हणत हुकांर भरला.
यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा निरोप घेऊन आले. खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिणची जागा काँग्रेस आपल्याकडे सोडवून घेण्यात यशस्वी ठरल्याचा निरोप नरोटे यांनी दिलीप माने यांना दिला.
यानंतर जमलेल्या माने समर्थकांनी एकच जल्लोष केला. दक्षिण सोलापूरच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तेव्हा काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी ही काँग्रेसची जागा आहे. आम्ही ती सोडणार नसल्याचा पावित्रा घेतला होता.
माने यांनी देखील पक्ष आणि पक्षाच्या नेत्यावर विश्वास व्यक्त केला होता..त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील अमर पाटील यांची उमेदवारी माघार घेण्यासंदर्भातील संकेत मिळत होते.
आज (ता.२५) रोजी दिलीप माने यांनी आपला समर्थकांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना दिलीप माने यांनी आपला पक्षश्रेष्ठीवर विश्वास असल्याचे सांगत आपण २९ तारखेला अर्ज भरू असे सांगितले. यावेळी माने समर्थकांची मोठी गर्दी सुमित्रा निवासस्थानासमोर जमली होती.
विशेष म्हणजे या मेळाव्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची देखील उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना नरोटे यांनी देखील दक्षिणची जागा काँग्रेसची असून ती जागा आम्हीच लढवणार असे स्पष्ट केले होते.
मेळावा संपल्यानंतर अवघ्या अर्धा तासात चेतन नरोटे प्रणिती शिंदेंचा निरोप घेऊन सुमित्रा निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी आपण दक्षिणची जागा काँग्रेसला सोडवून घेण्यात यशस्वी ठरल्याचा निरोप प्रणिती यांनी देण्यास सांगितल्याचे सांगितले. तेव्हा माने समर्थकांनी एकच जल्लोष केला.
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी काही वेळातच जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून दिलीप माने यांचे नाव निश्चित असेल असा विश्वासही नरोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क नेते अनिल कोकिळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काँग्रेस मधून एबी फॉर्म देण्याचा अधिकार हा नाना पटोले यांच्याकडे आहे. आमचे नेते संजय राऊत तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असून दक्षिणेत उमेदवार अमर पाटील हेच कायम असतील असे सांगितले.