Sunday, June 29, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तरुणाईला साद

MH 13 News by MH 13 News
4 May 2024
in महाराष्ट्र
0
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तरुणाईला साद
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

लातूर येथे मतदानाची शपथ, मानवी साखळीतून महाराष्ट्राचा नकाशा साकारून जनजागृती

MH 13 NEWS NETWORK

लातूर, : युवावर्ग हा देशाचे भविष्य असून आपल्या देशातील वैभवशाली लोकशाही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी युवावर्गाने आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे मतदान करून घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. निमित्त होते जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत आयोजित मतदार जागृती कार्यक्रमाचे. यावेळी उपस्थित युवा मतदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजाविण्याचा निर्धार करीत जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, स्वीपचे नोडल अधिकारी रामदास कोकरे आणि नागेश मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा, विजय माळाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि युवक यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी साडेसहा वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी मतदार जागृतीपर गीतांवर आधारित झुम्बा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा संकुलावर नियमितपणे व्यायामासाठी आणि विविध खेळांच्या सरावासाठी येणारे युवक-युवती यांनी या झुम्बा डान्समध्ये सहभागी होत ठेका धरला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनीही यामध्ये सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढविला. या माध्यमातून युवा वर्गापर्यंत मतदानाचे महत्व गीताच्या माध्यमातून पोहाेचविण्यात आले.

मतदार जागृतीसाठी जिल्हा क्रीडा संकुलावरील 400 मीटर स्वीप ध्वजाची मिरवणूक आयोजित करण्यात आली. उपस्थित युवावर्ग, नागरिकांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून महाराष्ट्र राज्याचा नकाशा साकारून मतदार जागृतीचा संदेश दिला. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित स्वाक्षरी मोहिमेस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते यावेळी प्रारंभ झाला. दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक संदीपन जगदाळे यांनी आपल्या पहाडी आवाजात मतदार जागृतीचा पोवाडा सादर करून आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेचा इतिहास मांडला. तसेच ही लोकशाही व्यवस्था बळकट करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असून प्रत्येकाने 7 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी तरुणाईवर : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. साहजिकच आपल्या देशात तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजाविणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका तरुणाईची आहे, तरुणाईने ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे येत्या 7 मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानामध्ये लातूरला अग्रेसर बनविण्याचा निर्धार युवक-युवतींनी करावा. प्रत्येक युवक-युवतीने 7 मे रोजी मतदान करावे. तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, आपल्या मित्र-मैत्रिणी यांना मतदानासाठी आग्रह धरून त्यांचे मतदान होईल, यासाठी पाठपुरावा करावा. आपल्या जिल्ह्याला मतदानात नंबर वन बनविण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

Previous Post

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक स्तुती चरण – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

Next Post

मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आवर्जून बजावावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
Next Post
मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आवर्जून बजावावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आवर्जून बजावावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.