mh 13 news network
मुंबई, दि. ३ : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन गुरमुख सिंग आणि विधान परिषदेचे माजी सदस्य दिवंगत घनश्याम राजनारायण दुबे, नारायण श्रीपाद वैद्य आणि सुभाष रामचंद्र चव्हाण यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग व दिवंगत सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.