MH 13NEWS NETWORK
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके १९४६ म्हणजेच ८ डिसेंबर रोजी तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन व शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले.
स्वराज्य व धर्माच्या आड येऊन हिंदुचे मंदिरांची तोड फोड करत रयतेवर अन्याय करणारा यवन राक्षस विजापुर हुन स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाला. आणि पंढरपुर, तुळजापूर येथे देवस्थानाची तोड फोड, करून वाई प्रांतात येऊन धडकला. छत्रपती शिवाजी महारांजानी अफजलखानास संपवण्यासाठी युक्तीचा वापर करुन, प्रतापगडच्या पायथ्याला या यवन राक्षसास संपवून केलेल्या रक्षणाचा विजयोत्सव म्हणून शिवप्रताप दिन हा दिन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत हिंदवी स्वराज्य व शाहजिजा शिवशंभु यांची प्रेरणा घेऊन कार्य करते. गेल्या दोन वर्षापासून सोलापुर सह नाशिक, पुणे, लातूर, बारामती पालघर या शहरात आज शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत शिवकार्यातून समाजकार्य करण्यात येत. गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात येतात. या मध्ये पर्यावरणपूरक गणपती, जागर नवदुर्गेचा जागर स्त्रीशक्तीचा, लाठी काठी प्रशिक्षण, गडकिल्ले संवर्धन इतर सामाजिक व शैक्षणिक, दुर्गसंवर्धन असे अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. आणि याच दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी दिवशी प्रतिष्ठान चा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. शिवप्रताप दिन व संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आले .
यावेळी संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे बोलताना म्हणाले शिवरायांच्या युक्तीने अफजल्याच्या शक्तीवर मिळवलेला विजय म्हणजे शिवप्रताप, शिवरायांच्या संयमाने अफजल्याच्या असंयमावर मिळवलेला विजय म्हणजे शिवप्रताप हा दिन विजयोत्सव म्हणून साजरा करतो. हा पराक्रम स्वराज्याचा जगप्रसिद्ध पराक्रम याच हिंदवी स्वराज्याची व पराक्रमाची प्रेरणा घेऊन देव, देश, धर्म व शिवकार्यातून समाजकार्य करण्यास युवकांनी पुढाकार घ्यावा आणि शिवप्रताप दिन व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे, स्वप्नील सावळगी, समर्थ हंचाटे, अभि पवा, इरण्णा मठपती, कार्तिक संगमनुर, संदीप निराळे, विठ्ठल जमादार आदी शिवसेवक व युवती उपस्थित होते.