Wednesday, March 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, त्याचवेळी भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही, हे सुद्धा सुनिश्चित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव-बदलापूर उल्हास येथील नदीवरील पूर नियंत्रण रेषेबाबत निगडित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किसन कथोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, ठाण्याचे जिल्हाधिकारी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेसह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पूर रेषेशी संबधित ब्ल्यू आणि रेड पूररेषेचा पुन्हा अभ्यास करावा. बदलापूर शहरातील पूर नियंत्रण आणि भविष्यात नदी पात्राजवळ अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तंत्रशुद्ध अभ्यास करून आणि नागरिकांची भविष्यातील सुरक्षा लक्षात ठेवूनच निर्णय घेण्यात यावा. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन गृहनिर्माण संस्थांना व मूळ जागा मालकांना पुनर्बांधणी करण्यास परवानगी देण्यासाठी त्यानुषंगाने निर्णय घेण्यात येतील.

या बैठकीत चुकीच्या पूर रेषांची दुरुस्त करणे,  नाल्यापासून अंतर सोडून बांधकामास परवानगी देणे, जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ब्लू लाईनमध्ये टीडीआर वापरण्यास परवानगी देणे, ज्या इमारतीत पूर्वीपासून व्यावसायिक गाळे असतील, अशा इमारतींना रस्त्यापासून एक मीटर उंचीवर व्यावसायिक गाळ्यांना परवानगी देणे, ब्लू लाईनमधील ज्या भूखंडावर विकास आराखड्‌यात आरक्षण टाकलेले आहे त्यांना शासनाने टीडीआर किंवा आर्थिक भरपाई देणे, पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

नदीचे खोलीकरण, संरक्षित भिंत बांधणे, आपटी व बॅरेज धरणाला स्वयंचलित दरवाजे बसविणे व पोशीर धरण लवकरात लवकर काम पूर्ण करणे, याविषयी यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

००००

Previous Post

दौंडमधील विकासासाठी सकारात्मक निर्णय घेणार

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.