Sunday, June 15, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

MH 13 News by MH 13 News
30 April 2024
in महाराष्ट्र
0
दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याबाबत आवाहन

मुंबई :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०-दक्षिण मध्य मुंबई’ व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी शाळांतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी, पालक यांच्यासमवेत मेळावे, बैठका, चर्चासत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदान जागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. प्रभात फेऱ्यांद्वारे दिव्यांग मतदारांनी मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करण्याबाबतचे आवाहन विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. या उपक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम येथील शिवाजी पार्क लायन्स डेफ स्कूल, दादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळा, माटुंगा येथील मीरा विद्यालय विशेष मुलांची शाळा, शिवडी येथील जय वकील ऑटिझम सेंटर, माहीम येथील लायन्स स्कूल फॉर डेफ, सीपी टॅंक येथील ए.के. मुन्शी योजना स्कूल, नॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड या दिव्यांगासाठी कार्यरत शाळा व संस्था सहभागी झाल्या .

दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग व्यक्तींची गृह भेट घेऊन त्यांना मतदानाच्यादिवशी व्हीलचेअर, मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यकतेनुसार मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा (रिक्षा, टॅक्सी तसेच व्हीलचेअर युक्त वाहने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाकरिता दिव्यांग मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहे, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंध मतदारांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपीमध्ये बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधेची माहिती देण्यासाठी कर्णबधिर प्रवर्गाच्या शाळांनी सांकेतिक भाषेमध्ये रिल्स बनवून समाज माध्यमांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे, असे सुनीता मते, जिल्हा समन्वय अधिकारी दिव्यांग सुगम्यता, मुंबई शहर यांनी सांगितले.

Previous Post

नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ 

Next Post

चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

Related Posts

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन
महाराष्ट्र

पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन

14 June 2025
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट
धार्मिक

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट

14 June 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा

14 June 2025
कालच्या पावसात सिंधुदुर्ग आघाडीवर; ७१ मिमीने राज्यात अव्वल
आरोग्य

कालच्या पावसात सिंधुदुर्ग आघाडीवर; ७१ मिमीने राज्यात अव्वल

14 June 2025
अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष पडणार भारी; कायद्याचे चाप बसणार व्यवसायिकांवर
आरोग्य

अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष पडणार भारी; कायद्याचे चाप बसणार व्यवसायिकांवर

14 June 2025
Next Post
चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.