MH 13 NEWS NETWORK
कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या करजगी येथील निवासी शिबिराचा समारोप..
अक्कलकोट
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक जात, धर्म व पंथ याच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणूनच ते समाजाला वंदनीय असतात. असे प्रतिपादन सरपंच विवेकानंद उंबरजे यांनी व्यक्त केले.
करजगी येथे मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या करजगी येथे विशेष श्रम संस्कार निवासी शिबिराचा समारोप करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच शब्बीर पटेल होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, निवासी शिबिरातील स्वयंसेवकांनी प्रत्येक वार्डात जाऊन स्वच्छता केली आहे. त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले आहे. पर्यावरण विषयक जाणीव जागृती, वृक्षारोपण संवर्धन याचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे नागरिकातील सामाजिक जाणीवा प्रगल्भ झाल्या आहेत.
शाबीर पटेल म्हणाले की, राष्ट्राचा विकासात स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागात गर्भवती माता, नवजात शिशु, आरोग्य सुविधा, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन इत्यादीसाठी प्रबोधन केल्यामुळे आम्हास अधिक ज्ञात झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन सुषमा येळीमेळी यांनी केले, आभार प्राध्यापक राजशेखर पवार यांनी मानले. कार्यक्रमास दयानंद उंबरजे, संगीता गंगदे, दस्तगीर गोडीकट्टी उपस्थित होते.
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील करजगी येथे निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी सरपंच विवेकानंद उंबरजे, दयानंद उंबरजे, शब्बीर पटेल व मान्यवर