प्रभाग ७ मधून देवीदास बनसोडे यांची दावेदारी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने दाखल केला इच्छुक फॉर्म
सोलापूर : प्रभाग क्रमांक ७ (OBC) मधून देवीदास विठ्ठल बनसोडे यांनी भारतीय जनता पक्षाकडे आपला इच्छुक फॉर्म आज अधिकृतरित्या दाखल केला.
गेली १५ वर्षे पक्षाशी निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या बनसोडे यांनी विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.2019 मध्ये विस्तारक म्हणून त्यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण बूथ रचना उभारण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. पुढे 2021 व 2023 मध्ये सलग दोनदा शहर चिटणीस म्हणून पक्ष संघटनात त्यांनी मजबूत कामगिरी नोंदवली.

सध्या 2023 पासून देवीदास बनसोडे हे सलग दोन वेळा मंडल अध्यक्षपद भूषवत असून संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते. उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तर माजी नगरसेवक किरण देशमुख यांचे बनसोडे हे निकटवर्तीय आहेत.
प्रभाग ७ मधून दाखल झालेल्या त्यांच्या इच्छुक फॉर्ममुळे आगामी निवडणुकीत भाजपमध्ये चुरस वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.








