सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो फिजिशियन, (मेंदू रोगतज्ञ) डॉ.आनंद मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. शहरातील स्पर्श हॉस्पिटलचे ते संचालक होते.
मुरूमचे सुपुत्र आणि सोलापूर येथील सुप्रसिद्ध डॉ.आनंद मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.तरी त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 02:00 वाजता त्यांच्या गावी मुरूम येथे होणार आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
कुंटेकर रोडवरील मुदकण्णा यांच्या शेतात अंत्यविधी केला जाणार आहे. मुरूम परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक रुग्णांशी त्यांचे स्नेह संबंध होते. संवेदनशील अभ्यासू डॉक्टर अशी त्यांची प्रतिमा होती.