Sunday, June 29, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्त्वाचा विषय 

MH 13 News by MH 13 News
24 September 2024
in महाराष्ट्र
0
महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्त्वाचा विषय 
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नवी दिल्ली, : शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत (SDG) आढावा घेणाऱ्या प्रस्तावावर प्रत्येक वर्षी संसद आणि राज्य विधानमंडळांच्या अधिवेशनात चर्चा व्हावी. त्याचप्रमाणे महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाच्या (CPA India Region) १० व्या परिषदेत व्यक्त केले. दिनांक २३ व २४ सप्टेंबर, २०२४ रोजी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद “शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या चर्चेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित आहेत. आज लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यसभेचे उप सभापती श्री. हरिवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन दिवसीय परिषदेस प्रारंभ झाला.

संसदेत आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिलांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी केलेल्या कायद्याचे स्वागत करुन डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता होणे आणि त्यासाठीचे प्रभावी कायदे बनविणे, त्याची सुयोग्य अंमलबजावणी करणे यासाठी सभागृहात सखोल विचारमंथन होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मार्च, २०२० मध्ये अशाप्रकारे पिठासीन अधिकारी यांनी विशेष ठराव मांडून चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. दरवर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत अशाप्रकारे चर्चा व्हावी आणि याबाबतच्या प्रस्तावाची रुपरेषा कामकाज सल्लागार समिती तथा शासनाने पिठासीन अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून तयार करावी. महिला सबलीकरणासंदर्भातील राष्ट्रीय गोलमेज परिषदेत आरोग्य, शिक्षण, महिला आणि मुलींची सुरक्षितता या मुद्यांवर भर देण्यात यावा. शाश्वत विकास उद्दिष्टांची महिला विकासाच्या प्रश्नांशी योग्य सांगड घातली जावी, त्याअनुरूप ध्येयधोरणे आणि कायदे निर्माण करण्यात यावेत, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यात यावा, पर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीने वापर आणि त्याचप्रमाणात त्याची सुयोग्य पुनर्निमिती करण्यात यावी, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पामध्ये ३ टक्के निधी राखून ठेवण्यात यावा, सभागृहामधील चर्चा निर्णयाभिमुख व्हावी यासाठी पीठासीन अधिकारी यांनी विशेष दक्षता घ्यावी, वि. स. पागे यासारखे चिंतनशील पिठासीन अधिकारी लाभल्याने साकारली गेलेली रोजगार हमी सारखी योजना या मुद्यांकडे उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी परिषदेचे लक्ष वेधले. उद्या दि. २४ सप्टेंबर रोजी या दोन दिवसीय परिषदेचा समारोप होईल.

Previous Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी २३७ कोटी निधी

Next Post

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
Next Post
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.