Monday, February 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज्य शासनाचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, व्यापार
0
राज्य शासनाचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..
0
SHARES
28
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या 17 वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 8 एप्रिल 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् 8 एप्रिल 2024 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 10 एप्रिल 2024 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 17 वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 10 एप्रिल 2024 पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 10 एप्रिल 2041 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर १० आणि एप्रिल १० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

Tags: Maharashtrastate government
Previous Post

मतदानासाठी मिळणार भरपगारी सुटी, सवलत..! वाचा

Next Post

किरिटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरणोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
किरिटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरणोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

किरिटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरणोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.