Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

केंद्रीय खनिकर्म सचिव व्ही. एल.कांथा राव

MH 13 NEWS NETWORK

राज्यातील खनिज क्षेत्रांच्या ई-लिलाव कार्यान्वयनासाठी बैठक

मुंबई, दि. २८ :  महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागाचे काम उत्कृष्ट असून मार्चपर्यंत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक खाण नव्याने कार्यरत होणार असून आगामी वर्षात विदर्भातील सात नवीन खाणी सुरू होतील राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन आणि लिलाव प्रक्रियेनंतरची सर्व अंमलबजावणी विहित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांथा राव यांनी दिले.

हॉटेल ताज येथे खनिकर्म विभागातर्फे खनिकर्म विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल.कांथा राव  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्याचे खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव  डॉ.इकबाल सिंह चहल, विभागाचे  महासंचालक डॉ.टी.आर.के. राव, खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, खनिकर्म क्षेत्रातील उद्योजक यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय सचिव व्ही. एल. कांथा राव म्हणाले की,२०१५ मध्ये प्रमुख खनिजाच्या खणक्षेत्राचे इ – लिलाव पद्धतीने वाटप सुरू झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्याने आजअखेर एकूण ४० खाणक्षेत्राचा यशस्वीपणे ई-लिलाव केला असून, त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात, चालू वर्षात एका खांणपट्ट्यातून उत्खनन आणि खनिजाची वाहतूक सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यातून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकणार आहे.

यावेळी खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमीत कमी असावा.यामुळे उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रक्रियेत वेग येईल आणि शासनाला महसूल वाढीस मदत होईल, असे सांगितले. खनिकर्म विभागातील कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, राज्यातील खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी दिलेल्या सूचनांवर गांभीर्याने विचार करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे केंद्रीय सचिव व्ही. एल.कांथा राव यांनी सांगितले.

खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.इकबाल सिंह चहल यांनी खनिकर्म विभागाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची यावेळी माहिती सादर केली. खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा यावेळी मांडल्या.

Previous Post

खून प्रकरणी जन्मठेप झालेल्या आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

Next Post

राजभवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ कार्यक्रम संपन्न

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
राजभवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ कार्यक्रम संपन्न

राजभवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ कार्यक्रम संपन्न

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.