Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय ; पुरुष व महिला संघाची कामगिरी

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय ; पुरुष व महिला संघाची कामगिरी
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

५७ वी पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय, पुरुष व महिला संघ उपांत्य फेरीत
रेल्वे कोल्हापूरचे पुरुष संघही उपांत्य फेरीत

पुरी (ओडिशा), दि. ३ एप्रिल – महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी आपल्या विजयी लयीत कायम राहात ५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. रेल्वे आणि कोल्हापूरच्या पुरुष संघांनीही प्रभावी कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

महाराष्ट्र पुरुष संघाची दमदार खेळी
पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ३१-२४ असा पराभव केला. मध्यंतरानंतरच्या डावात पश्चिम बंगालने १६-१० अशी जोरदार लढत दिली होती. मात्र मध्यंतराची २१-८ अशी निर्णायक आघाडी महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. यात महाराष्ट्राच्या पियुष घोलम याने आपल्या धारदार आक्रमणात ६ गडी बाद केले. शुभम थोरातने २.३० मि. संरक्षण व नरेंद्र कातकडेने १.५० व १.१० मि. संरक्षणाची खेळी केली. कोलकत्ताच्या सुमन बर्मन (१.५० मि. संरक्षण व २ गुण) याची अष्टपैलू खेळी व सुमन डेबनाढ (१० गुण) याची आक्रमणाची खेळी अपुरी पडली.

यापूर्वी झालेल्या सामन्यात महाराष्ट्रने महाराष्ट्र पोलीस संघाचा २८-१४ असा एक डाव राखून १४ गुणाने दणदणीत विजय मिळविला. यात सुयश गरगटे (नाबाद २.३० मि. संरक्षण व ६ गुण ) व प्रतीक वाईकर (१.१० मि. संरक्षण व ६ गुण ) यांनी अष्टपैलू कामगिरी करत विजय सोपा केला. महाराष्ट्र पोलीसकडून मनोज घोटेकर (१.०० मि. ४ गुण ) याचा अष्टपैलू खेळ एकाकी होता.

महिला गटात महाराष्ट्राची विजयी घोडदौड
महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्रने कोल्हापूरवर २०-१४ असा एक डाव राखून सहा गुणांनी दणदणीत विजय मिळवला. प्रियंका इंगळेने कोल्हापूरचे आक्रमण खिळखिळीत करत तब्बल ५.१८ मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार गुण वसूल करून विजय निश्चित केला. पायल पवार (२.२२ मि. संरक्षण ) व संध्या सुरवसे (नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनीही दिलेली साथ विजयात भर घालणारी ठरली. कोल्हापूरच्या श्रावणी पाटीलची (१.४५ मि. संरक्षण व २ गुण) खेळी फुकट गेली.
तत्पूर्वी महाराष्ट्रने केरळचा ४४-१० असा ३४ गुणांनी धुव्वा उडवला होता. यातही प्रियांका इंगळेने (३.३२ मि. १२ गुण ) अष्टपैलू कामगिरी बजावली होती.

इतर उपांत्यपूर्व निकाल:

अन्य उपांत्यपूर्व निकाल : पुरुष : ओडिशा विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश २९-२६, कोल्हापूर वि. वि. कर्नाटक ३२-२५, रेल्वे वि. वि. केरळा ३७-२४.

महिला : दिल्ली वि. वि. कर्नाटका २६-२२, एअरपोर्ट ऑथोरिटी वि. वि. गुजरात २१-१३, आंध्र प्रदेश वि. वि. उत्तर प्रदेश २४-१९.

असे होणार उपांत्य सामने
पुरुष : महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा, रेल्वे विरुद्ध कोल्हापूर.
महिला : महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, एअरपोर्ट ऑथोरिटी विरुद्ध आंध्र प्रदेश.

Previous Post

श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी जया ‘भाऊ’, देवेंद्र’दादा’ ; केली विकास कामांची पाहणी

Next Post

सम्यक संस्थेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
सम्यक संस्थेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

सम्यक संस्थेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.