Sunday, September 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात

MH13 News by MH13 News
2 months ago
in मनोरंजन, सोलापूर शहर
0
तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

शाहिरी कला जपली पाहिजे – चंद्रकांत फाटेसोलापूर,(प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली शाहिरी परंपरा सध्याच्या काळाच्या ओघात लोप पावत चाललेली आहे. वीरांचे स्फुरणगाणं म्हणजे शाहिरी कला आहे. ही कला सध्याच्या आधुनिक युगामध्ये जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत मोहोळचे शाहीर कै.भाई विश्वासराव फाटे यांचे चिरंजीव चंद्रकांत फाटे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महाराष्ट्राच्या समृद्ध शाहिरी परंपरेचा गौरव करणाऱ्या ‘शाहिरी महोत्सवा’चे आयोजन सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले होते. या शाहिरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फाटे हे बोलत होते. यावेळी अनंत जोशी ,नगरसेवक सात्विक बडवे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व संचालनालय विभागाचे सदाशिव खैरे संयोजक अमोल धाबळे, प्रशांत बडवे, ज्येष्ठ साहित्यिका नशिमा पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जळगाव येथील शाहीर वेदराज कपाटे, अशोक पाटील, उमेश पाटील, जितेंद्र भांडारकर, उमेश भांडारकर, शिवाजीराव धर्मा पाटील ,योगेंद्र राऊळ , भूषण शरद पवार, बाळकृष्ण पाटील यांनी आपली शाहीरी कला सादर केली.प्रारंभी या कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक करून शाहिरी महोत्सवाची माहिती सांगितली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि वाद्य पूजन करून महोत्सवाचा शुभारंभ झाला.शाहिरांच्या वारसदारांकडून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सोमवार ,मंगळवार, बुधवार, असे तीन दिवस दररोज सायंकाळी ७.०० वाजता शाहीरी महोत्सव सादर होणार आहे. या महोत्सवातून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी, सामाजिक प्रबोधनाशी आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेशी नाते सांगणाऱ्या शाहिरी कलेचा जागर मांडला जाणार आहे. हा कार्यक्रम माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी सोलापूरच्या रसिकाकरिता आयोजित केलेला आहे.महाराष्ट्राची शाहिरी परंपरा ही केवळ मनोरंजनाची लोककला नसून, इतिहास, शौर्य, पराक्रम, सामाजिक प्रबोधन, राष्ट्रभक्ती आणि लोकभावना व्यक्त करणारे प्रभावी सांस्कृतिक माध्यम आहे. पोवाडे, लावण्या आणि विविध शाहिरी काव्यप्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, वीरपुरुषांचे कार्य, सामाजिक जीवन आणि जनजागृतीचे विचार पिढ्यान्‌पिढ्या जनमानसात पोहोचविले गेले आहेत. ओजस्वी शब्दरचना, प्रभावी कथन, लयबद्धता आणि उत्स्फूर्त सादरीकरण अशी शाहिरी पर्वणी सोलापूरकरांना अनुभवाला मिळणार आहे.. शाहीर सूरज किरणसिंग राऊळ व सहकारी, शाहिरा मंगल दळवी व सहकारी तसेच शाहीर कल्याण काळे व सहकारी यांनी सादरीकरण केले.हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात रांगोळी काढून शाहिरी महोत्सवाला आकर्षक करण्याचा प्रयत्न संयोजकाकडून करण्यात आला.

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिल्हा परिषदेच्या वारी नियोजनाचे कौतुक ; उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजित पवार व अधिकाऱ्यांचे अभिनंदन..

Next Post

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.