Wednesday, April 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहन तपासणी करावी – मुंबई शहर जिल्ह्याचे आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांचे निर्देश

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहन तपासणी करावी – मुंबई शहर जिल्ह्याचे आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांचे निर्देश
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई,: स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) वाहन तपासणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, वाहनतपासणी दरम्यान रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू व शस्त्रसाठा पोलिसांच्या मदतीने तपासावा. संपूर्ण तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामकाजावर निरीक्षक (खर्च) देखरेख ठेवणार आहे. तसेच वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमने सतर्क राहून त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल विहित वेळेत संबंधितांना पाठवावा, असे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांनी दिले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज आयोजित या प्रशिक्षण शिबिरात श्री. महाजन यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरास उपजिल्हाधिकारी तथा तक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटे, अतिरिक्त जिल्हा माहिती-तंत्रज्ञान अधिकारी विद्याधर शेळके आदी उपस्थित होते. या शिबिराला `३०-मुंबई दक्षिण मध्य` व `३१-मुंबई दक्षिण` लोकसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीममधील (SST) नियुक्त अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशासनाने स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त केल्या आहेत. २६ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे दाखल होणार असून या पार्श्वभूमीवर सदर टीमचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरात भारत निवडणूक आयोगाने Election Seizure Management System (ESMS) हे विकसित केलेले ॲप कसे हाताळावे, याबाबत श्री. महाजन यांनी सविस्तर माहिती दिली.

लोकसभा निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमची (SST) नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

Next Post

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.