Saturday, May 31, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Active मोड| खासदार प्रणिती शिंदेंची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक ;   ‘या’  गावांच्या पाणीप्रश्नाबाबत..!

MH13 News by MH13 News
12 June 2024
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
243
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील  विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला.


प्रणिती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील  लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावला आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मतदासंघांतील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घे त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्या. यावेळी प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.



या बैठकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडण्याबाबतही पाठपुरावा केला. तसेच  मागील आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात ही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनात सूचना केल्या. खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भात ही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केल्या.


अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदत ही अत्यल्प आहे. त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास सरसकट पन्नास हजाराची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंतीही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे केली.

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
दरम्यान यावेळी कुंभारी आणि गर्दनहळी या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबीयांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही खासदार शिंदे यांनी केले.

तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा देखील जाणून घेतला. तसेच या जलवाहिनीची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याशिवाय ग्रामीण भागात  नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत,  शेतकऱ्यांना दूध दराचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे सूचना प्रशासनास केले आहेत. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष  नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, अशफाक बालोरगी, शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, शालिवाहन माने, मनोज यलगुलवार, सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, हरिष पाटील, अमर सुर्यांवशी, संदीप पाटील, राजेश पवार , मल्लिकार्जुन पाटील, आदित्य फत्तेपूरकर, अशोक देवकते, गुरू म्हेत्रे, भारत जाधव, व्यंकट मोरे, पांडुरंग जावळे, मिलिंद भोसले, रविकिरण कोळेकर, सचिन गुंड, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, संदीप सुरवसे यांच्यासह मतदारसंघातील विविध वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Collector office solapurpraniti shinde Congress
Previous Post

अश्‍विन्स वसंत फर्निशींग्सचे जुळे सोलापुरात थाटात उदघाटन

Next Post

आज मराठा समाज देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जरांगे पाटलांची प्रकृती गंभीर

Related Posts

हिप्परगा तलावाची क्षमता ८०% पार, संभाव्य धोका लक्षात घेऊन सतर्कतेचं आवाहन
महाराष्ट्र

हिप्परगा तलावाची क्षमता ८०% पार, संभाव्य धोका लक्षात घेऊन सतर्कतेचं आवाहन

31 May 2025
चिंचोली एमआयडीसी येथील आयएमसी सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा..! प्रशासनाचे दुर्लक्ष..?
नोकरी

चिंचोली एमआयडीसी येथील आयएमसी सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा..! प्रशासनाचे दुर्लक्ष..?

31 May 2025
जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक; ११४४ कोटींच्या कामांना हिरवा कंदील
महाराष्ट्र

जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक; ११४४ कोटींच्या कामांना हिरवा कंदील

31 May 2025
वळवाच्या नुकसानीस त्वरित प्रतिसाद – पंचनामे व आराखडे तत्काळ सादर करा
कृषी

वळवाच्या नुकसानीस त्वरित प्रतिसाद – पंचनामे व आराखडे तत्काळ सादर करा

31 May 2025
शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी – १५ जूनपासून ऑनलाईन अर्ज सुरू
महाराष्ट्र

शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी – १५ जूनपासून ऑनलाईन अर्ज सुरू

31 May 2025
विकासकामांचा वेग वाढवा – एमएसआरडीसीकडे शासनाची मागणी
महाराष्ट्र

विकासकामांचा वेग वाढवा – एमएसआरडीसीकडे शासनाची मागणी

31 May 2025
Next Post

आज मराठा समाज देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जरांगे पाटलांची प्रकृती गंभीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.