MH 13News Network
मराठा आरक्षण आंदोलनासाठी आणि सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सोलापूर शहरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज सकाळी निवेदन देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात सोलापूर शहर आणि जिल्हा हा हॉटस्पॉट ठरला होता. आंदोलन चळवळीमुळे सोलापूर राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू असून गेल्या पाच दिवसापासून त्यांच्याकडे सत्ताधारी पक्षाने दुर्लक्ष केल्यामुळे मराठा समाज हा संतप्त झाल्याचे चित्र समोर येत आहे.
राज्य सरकारने तातडीने उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा होणाऱ्या गंभीर परिणामास सरकारला सामोरे जावे जागेल असा इशारा देण्यात येणार असून आमचा माणूस मरायची सरकार वाट बघतंय का.? असा प्रश्न निर्माण होत आहे. निवेदनाची तात्काळ दखल सरकारने घ्यावी अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी सांगितले आहे.