MH 13News Network
सोलापूरचे नाव देशभरात घेऊन जाणारा आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू हा आपल्या उत्तर सोलापूर मतदारसंघातील आहे याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी साईराज याच्या शुभेच्छा प्रसंगी काढले. एशियन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आज रविवारी दुपारी आमदार देशमुख यांच्या कार्यालयात साईराज हणमे आणि त्याचे प्रशिक्षक दीपक चिकणे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी, प्रसाद कुलकर्णी, देविदास चेळेकर,युवा नेते देविदास बनसोडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
थेट क्रीडा अधिकाऱ्यांना आमदारांचा कॉल..!
दरम्यान,आमदार देशमुख यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्याशी फोन द्वारे सोलापुरातील धनुर्विद्या या क्रीडा प्रकाराच्या प्रगतीची माहिती घेतली. देशभरात सोलापूरचे नाव मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी या क्रीडा प्रकाराला लागेल ते सहकार्य शासन स्तरावर करण्याचे आश्वासन त्यांनी क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांना दिले.
साईराज या खेळाडूंच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव देश पातळीवर होत असणे हे अभिमानास्पद आहे. असे सांगताना आमदार फंडातून क्रीडा साहित्यासाठी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी लागलीच यावेळी दिले.
भविष्यातसुद्धा साईराजच्या पाठीशी मी नक्की असेन. एशियन क्रीडा प्रकारातून तू नक्कीच मिळेल आणशील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चीन तायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी साईराज दिनेश हणमे याची निवड झाली आहे.
सोनीपत हरियाणा येथे झालेल्या आशियाई युथ चॅम्पियन्सशीपसाठी झालेल्या निवड चाचणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील साईराज हणमे याने देशात प्रथम क्रमांक मिळवून भारतीय संघात प्रथम क्रमांक मिळवला.
देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्हामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे.