सोलापूर :- पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अक्कलकोटचे माजी नगरसेविकेचा पती ऋतुराज उर्फ बंटी राठोड याच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांचे समोर होऊन पुराव्या अभावी त्यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, दि:- 8/8/ 2019 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर तांडा अक्कलकोट येथे पोलिसांनी छापा टाकून अवैध दारू विक्री करणारा सचिन सुरेश चव्हाण यास ताब्यात घेऊन जात असताना आरोपी ऋतुराज उर्फ बंटी राठोड हा तेथे येऊन पोलिसांना तुम्ही आमचेच लोकांवर कारवाई का करता, असे म्हणून सुरेश चव्हाण यांच्या हाताला धरून तू येथेच थांब असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करून अंगावर धावून गेला, अशा आशयाची फिर्याद गजानन अमोघसिद्ध गायकवाड यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली होती, त्यावर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात एकंदर 4 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात सरकारी पक्षाचे म्हणणे आहे तसे गृहीत धरले तरी देखील सदरचा गुन्हा हा सरकारी कामात अडथळा आणल्याचा सौज्ञेत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्देश मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड मिलिंद थोबडे, ॲड दत्ता गुंड तर सरकारतर्फे ॲड आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले.