mh 13 news network
म.सा.प. सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टतर्फे ‘मला आवडलेले व्याख्यान’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टतर्फे १७ ते १९ डिसेंबर दरम्यान हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्याने ऐकून स्पर्धकांनी ‘मला आवडलेले व्याख्यान’ या विषयावर निबंध लेखन करायचे आहे. यातील तीन उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या निबंध स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थी आणि श्रोत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रा. सं. चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोर चंडक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुतिश्री वडगबाळकर यांनी केले आहे.