mh 13 news network
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त दि.१४ ते १९ डिसेंबर या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर यात्रेचा शुभारंभ प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही दि. १४ रोजी दत्त जयंती दिवशी रात्री साडेआठ वाजता रथोत्सवाने होणार आहे
.
दि.१५ रोजी रात्री आठ वाजता प्रेक्षणिय शोभेचे दारुकाम,
दि.१६ रोजी मंदिरासमोरील मैदानावर दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान,
दि. १८ रोजी कळसारोहण तर दि. १९ रोजी जनावरांचे प्रदर्शन होईल.
तसेच दि. १४ ते १९ डिसेंबर दरम्यान गायनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देवस्थान पंच कमिटीने दिली आहे.