MH 13News Network
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून महिला पत्रकार विजयश्री गुळवे ह्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी व सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करत असून त्यांनी दैनिक मध्ये अनेक वर्ष काम केलं असून वंचित पिढीत अन्याय ग्रस्त अत्याचार ग्रस्त घटकाच्या मूलभूत प्रश्नावर प्रशासन दरबारात आवाज उठवला असून सर्वसामान्य माणसाच्या अडचणी व समस्या ची त्यांना चांगली जाणीव आहे विशेष करून महिलांना न्याय मिळवा त्यांच्या अडचणी सोडवायला हव्या म्हणून पत्रकार विजयश्री गुळवे यांनी नुकतेच S G नावाने न्यूज पोर्टल सुरु केलं असून या S G न्यूज पोर्टल चे सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार व लोकप्रहार न्यूज चॅनल चे संपादक जमीर शेख यांच्या हस्ते शानदार लॉंचींग करण्यात आले.
पत्रकार विजयश्री गुळवे यांचे कार्य प्रेरणादायी
महिला पत्रकार विजयश्री गुळवे यांनी आपल्या पत्रकारिता च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून व सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता केली असून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पोर्टल लॉंचींग वेळी व्यक्त करून महिला पत्रकार विजयश्री गुळवे यांचे कार्य निवेदित पत्रकारांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार असल्याचे म्हटलं आहे
S G न्यूज च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न नक्कीच सूटतील अशी
पत्रकार विजयश्री गुळवे या जुन्याजाणत्या पत्रकार असून सोलापूर शहरातील जनतेच्या समस्या त्यांना चांगल्या ठाऊक आहेत S G न्यूज च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न त्या पोर्टल च्या माध्यमातून विजयश्री गुळवे यांच्या हातून सूटतील अशी अपेक्षा लोकप्रहार न्यूज चे संपादक जमीर शेख यांनी व्यक्त करून महिला पत्रकार विजयश्री गुळवे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी इरफान शेख,अक्षय बबलाद ,इलियास सिद्दीकी , इरफान शेख,.श्रीनिवास बोगा,गुरुनाथ कोळी,सिद्धलिंग नवले,प्रदीपकुमार शिंदे,अजमेर शेख,बंदेनवाज शेख,सादिक मुजावर,अकिब मडकी,मोहसीन बागवान,सद्दाम शेख,उजेफ इनामदार,शिवानंद येरटे,सागर इप्पलपल्ली,आशिष भुदत्त,सादिक शेख,विश्वनाथ बिराजदार,सैफन शेख,नागार्जुन राऊळ,शाहनवाज शेख,इब्राहिम मुजावर,इम्रान सय्यद,मोहसीन कोतकुंडे,प्रसाद जगताप,सकीब शेख,प्रसाद दिवानजी ,वाहिद शेख सह आदी डिजिटल पत्रकार उपस्थित होते.