जैन गुरुकुलात स्नेहपूर्ण कार्यक्रम
mh 13 news network

सोलापूर-वालचंद शिक्षण समूहातील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे दहावी वर्गशिक्षक संजय भस्मे,रोहिता शहा,मिलिंद खोबरे व सुभाष नागरसे यांच्यासह सर्व शिक्षक व ९वी,१०वी वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी णमोकार महामंत्राने समारंभाची सुरुवात झाली.नववीतील विद्यार्थिनी नक्षत्रा लोखंडे हिने प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी दहावीतील नंदिनी बिराजदार, प्रांजली शिंदे, अंजली इरकल, तन्मय घाडगे, दीपाली आयतोडे व मल्हार गुरव या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून प्रशाला व नर्सरीपासून शिकविलेल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तदनंतर दहावीच्या वर्गशिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा समारंभाच्या यशस्वीतेसाठी तनय गांधी व नववीचे वर्गशिक्षक प्रणिल माणिकशेटे, प्रसाद कुलकर्णी, विकास शिळ्ळे व नागनाथ येळेगाव यांनी परिश्रम घेतले.

या सदिच्छा समारंभाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनी स्नेहा सुतार व मानसी भिंगारे यांनी तर खुशी चव्हाण हिने आभार मानले.