MH 13News Network
सोलापूरचे नाव देशभरात घेऊन जाणारा आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू हा सोलापुरातला आहे याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांनी साईराज याच्या शुभेच्छा प्रसंगी काढले.
प्रारंभी देशमुख यांनी सोलापुरातील या क्रीडा प्रकाराची कशी वाटचाल सुरू आहे याची माहिती घेतली. सोलापूरचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे. अशा खेळाडूंच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव देश पातळीवर होत आहे हे अभिमानास्पद आहे. असे सांगताना आमदार फंडातून क्रीडा साहित्यासाठी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव, माजी नगरसेवक सुभाष शेजवाल, तसेच साईराज याचे वडील दिनेश हणमे व इतर मान्यवर उपस्थित होते.
चीन तायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी साईराज हणमे याची निवड झाली आहे.
सोनीपत हरियाणा येथे झालेल्या आशियाई युथ चॅम्पियन्सशीपसाठी झालेल्या निवड चाचणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील साईराज हणमे याने देशात प्रथम क्रमांक मिळवून भारतीय संघात प्रथम क्रमांक मिळवला.
देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्हामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे.