MH 13News Network
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार, कार्याध्यक्षपदी रवी मोहीते तर खजिनदार सुशिल बंदपट्टे यांची निवड
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरात शिवस्मारक सभागृहात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाची पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीस अखंङ हिंदूस्थानचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मुर्तीस व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
तदनंतर दिवंगत स्व.मा.नगरसेवक किरण भैय्या पवार व सुनील कामाठी यांना आदरांजली वाहण्यात आली या वेळी व्यासपीठावर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर नानासाहेब काळे ,कार्याध्यक्ष श्रीकांत ङांगे,शिवचरिञकार ङाॕ.शिवरत्न शेटे,
जयकुमार माने, मनीष भैया देशमुख, दिलीप कोल्हे ,राजन जाधव, अमोल शिंदे माऊली पवार, विनोद भोसले ,सुनील रसाळे,, शिवाजीराव घाडगे गुरुजी, राजाभाऊ सुपाते, विनोद भोसले, विजय भोईटे ,विजय पुकाळे ,बाळासाहेब पुणेकर, बजरंग जाधव ,नागेश ताकमोगे, श्रीकांत घाडगे ,अंबादास शेळके, शिवकुमार कामाठी ,प्रीतम परदेशी ,प्रकाश ननवरे ,राजू राजाभाऊ काकडे ,विक्रांत मुन्ना वानकर ,लहू गायकवाड ,माऊली पवार ,जयवंत सलगर, सूर्यकांत पाटील, जी के देशमुख सर ,भाऊसाहेब रोडगे , प्रताप सिंह चव्हाण,जयवंत सलगर . निर्मला शेळवणे, स्वाती पवार, मुळे मॅडम ,राजू आलुरे, आबा सावंत ,माजी अध्यक्ष मतीन भाई बागवान,लताताई फुटाणे ,विवेक फुटाणे,सचिन स्वामी ,देविदास घुले यांची उपस्थिती होती.
यानंतर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – सुभाष पवार
कार्याध्यश – रविमोहिते
उपाध्यश – अर्जुन शिवशिंगवाले
उपाध्यक्ष -अंबादास सपकाळे , उपाध्यक्ष – दिलीप बंदपटे
उपाध्यश – नागेश यलमेळी
उपाध्यश – मनिषाताई नलावडे महिला सेक्रेटरी – लताताई ढेरे ,सहसेक्रेटरी – सचिन तिकटे
खजिनदार – सुशिल बंदपट्टे, सहखजिनदार – गणेश माळी मिरवणूक प्रमूख – महेश धाराशिवकर , उप मिरवणूक प्रमूख – नामदेव पवार कुस्ती प्रमूख – बापूजाधव अमर दुधाळ प्रसिध्दी प्रमूख – वैभव गंगणे बसू कोळी
यांची निवङ करण्यात आली.व या निवङीबद्दल नूतन कार्यकारणीचा सत्कार सोहळा याप्रसंगी पार पङला.
या वेळी शिवचरिञकार ङाॕ.शिवरत्न शेटे यांनी छञपती शिवाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी विविध मंङळांनी स्पर्धा लावून ङाॕल्बिचा कर्कश आवाज वाजवून एकमेकांत चढा -ओढ करण्यापेक्षा लेझिम चे उत्कृष्ट ङाव व मर्दानी खेळ सादर करावेत. सामाजिक उपक्रमांवर प्राधान्याने भर दयावा. मिरवणूका थाटात निघाल्याच पाहिजे पण पारंपरिक पद्धतीने वादयवृंद लावून असे जाहीर आवाहन केले.छञपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्राला दिशा देणारे असावेत.तद्नंतर राजन जाधव यांनी त्यांच्या भाषणात प्रत्येक मंङळाच्या मिरवणूका छञपती संभाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक मंङळाने सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे आवाहन केले.तर माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी शिवजयंती मिरवणूकीत वाद होणार नाहीत याची प्रत्येक शिवभक्ताने काळजी घेणे गरजेचे आहे.मध्यवर्ती महामंङळ ट्रस्टीच्या वतीने वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशाचे सर्व मंङळांनी तंतोतंत पालन करणे आवाश्यक आहे.यंदाही शिवजयंती मिरवणूकीत २१ हजार शिवभक्तांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून या स्नेहभोजनाचा हजारो शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमोल शिंदे यांनी यावेळी केले.
यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाचे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत ङांगे यांनी प्रत्येक मंङळाच्या मिरवणूका जल्लोषात काढा.या मिरवणूका काढत असताना मध्यवर्ती मंङळ ट्रस्टच्या वतीने दिलेल्या आदेशाचे पालन करा आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन केले.
यानंतर माजी उपमहापौर दिलिप कोल्हे यांनी DJ व लेझिम अशा मंङळांच्या स्वतंत्र एक रांगा करुन त्या त्या मंङळांना दिलेल्या रांगा नुसार जाण्याच्या सूचना करा अशी विनंती मध्यवर्ती महामंङळाकङे आपल्या भाषणातून केली.
या बैठकीस हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.