MH 13 NEWS NETWORK
मुंबई : मतदान प्रक्रिया बाधित होत आहे, असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले आहे.