Wednesday, July 2, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट

MH 13 News by MH 13 News
27 May 2024
in कृषी, सोलापूर शहर
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट
0
SHARES
18
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

.जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन
*बीबीदारफळ येथील डाळिंब फळ पिकाच्या एक खोड लागवड पद्धत तर पाकणी येथील परंपरागत लागवड पद्धतीच्या प्लॉट ला भेट


*कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार


सोलापूर,-डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे. परंतु मागील काही वर्षापासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग व त्यातून डाळिंबाचे कमी दर्जाचे पीक आल्याने न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नव तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे भेट देऊन येथील डाळिंब फळ पिकावर व त्यातील नव तंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री. मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ करणे तसेच येथील शेतकऱ्यांना डाळिंब फळ पिकातून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देऊन येथील शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांनी चर्चा केली. डाळिंब फळ पिकावर पडणाऱ्या विविध रोगावर प्रतिकार करण्यासाठी दर्जेदार डाळिंब पिकाचे वाण तसेच विविध प्रतिबंधात्मक औषधी तसेच या पिकाच्या उत्पादनासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना याविषयी प्रशिक्षित करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राची कशा पद्धतीने मदत होईल याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली.
कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संवाद साधण्यात येणार असून डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
बीबीदारफळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी श्री. संतोष निळ यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भेट दिली. शेतकरी संतोष निळे यांनी डाळिंब पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन लागवड पद्धतीचा वापर केलेला आहे. ही पद्धत म्हणजे एक खोड लागवड पद्धत होय. ही पद्धत बैरागवाडी तालुका माढा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी विकसित केलेली आहे. या एक खोड लागवड पद्धतीमुळे डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ मिळते अशी माहिती श्री.माने यांनी यावेळी दिली.
पाकणी येथील डाळिंब पिकवणारे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी डाळिंब फळ पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची डाळिंब फळ पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाचे क्षेत्र वाढवणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल, प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
*भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी:-
मोहोळ तालुक्यातील हिवरे येथील भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन या कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच कंपनीला पुढील काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास ती सोडवण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी कंपनी जवारीचे क्लिनिंग, ग्रेडिंग, ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग कशा पद्धतीने करत आहे याविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली. कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत आणखी शेतकरी उत्पादक कंपन्या जिल्ह्यात कशा पद्धतीने स्थापन करता येतील याविषयी कृषी विभाग व आत्मा ने नियोजन करावे असेही त्यांनी सूचित केले.
ही भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी ज्वारी उत्पादनात अग्रेसर असून या कंपनीचा न्यूट्री सोर्घ हा ब्रँड महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे, अशी माहिती कंपनीचे प्रमुख सचिन थिटे यांनी दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार व कृषी विभागातील सर्व अधिकारी तसेच भुसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सविता बनसोडे यांना सोलापूर विद्यापीठाची विधी अभ्यासक्रमाची पीएचडी पदवी प्राप्त

Next Post

८.९९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड २५ जून रोजी

Related Posts

हकालपट्टी! मराठा क्रांती मोर्चाचा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एल्गार..! Live
राजकीय

हकालपट्टी! मराठा क्रांती मोर्चाचा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एल्गार..! Live

1 July 2025
इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..
आरोग्य

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..

28 June 2025
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड
सामाजिक

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

25 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
Next Post
इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा सुरू

८.९९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड २५ जून रोजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.