mh 13 news network
लोकशाही दिन: नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत
उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांचे आवाहन
सोलापूर- जिल्हा लोकशाही दिनासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून, गावातून नागरिक अर्ज सादर करीत असतात. परंतु अर्ज सादर करावयाची प्रक्रिया माहिती नसल्याने त्यांचे अर्जावर लोकशाही दिनाचे निकषांनुसार कार्यवाही करणे शक्य होत नाही. यासाठी सामान्य नागरिकांना जिल्हा लोकशाही दिनासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी
जिल्हा लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे:- जिल्हा लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात सादर करावा, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी,लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतींत पाठविणे आवश्यक राहील, तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
लोकशाही दिनासाठी पुढील विषयावरील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत: - न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपिल्स (अर्धन्यायिक प्रकरणे, अपिल केसेस),सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी,विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज,अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज,तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर.
लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचा नमुना व आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:-.अर्जदाराचे नाव व पुर्ण पत्ता,.दुरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल असल्यास, विषय, तालुका लोकशाही दिनात अर्ज केला होता काय? असल्यास टोकन क्रमांक, तहसिदारांकडून मिळालेले उत्तर तसेच दिनांक व अर्जदाराची सही आवश्यक, आहे
तसेच लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. त्यावेळी मूळ अर्जदार यांनी स्वत: उपस्थित रहावे, विहीत नमुन्यात अर्ज त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक, वरील बाबींची पुर्तता केली नाही तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही, प्रकरण थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असले तर तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.