Friday, December 5, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

परदेशी शिष्यवृत्तीकरिता १२ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
परदेशी शिष्यवृत्तीकरिता १२ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी  दि.12 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण आयुक्त यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाची परदेशी शिष्यवृत्ती योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. सन 2003 पासून ही योजना राबविली जात आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी ३० % जागावर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या  www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘ताज्या घडमोडी’ या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावी. परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्त्यावर पाठवावेत. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम डी  व एम एस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी, असे समाज कल्याण आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

Previous Post

वांग मराठवाडी, उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Next Post

दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे – राज्यपाल रमेश बैस

Related Posts

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..
आरोग्य

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..

5 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा
महाराष्ट्र

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा

24 November 2025
लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र

लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५

18 November 2025
Next Post
दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे – राज्यपाल रमेश बैस

दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे – राज्यपाल रमेश बैस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.