Monday, February 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठक संपन्न

राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना

मुंबई – राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीच्या बैठकीचे आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव साळवी सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे सर्वश्री उपाध्यक्ष, आमदार भाई जगताप, माजी आमदार अमरसिंह पंडित, दिनकर पाटील, रा. उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, असोसिएशनचे आजीव सदस्य तथा उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांच्या रकमा वाढविण्यात आल्या आहेत. खेळांना महत्व प्राप्त व्हावे यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामीण भागात कबड्डी जास्त रूजली आणि वाढली असल्याने आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. कबड्डी खेळाला सुवर्ण दिवस आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय संहितेनुसार कार्यकारिणी निवडणूक घेण्यात यावी. स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. 21 जून रोजी नव्याने होणाऱ्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, 19 जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

रोहयोच्या सिंचन विहीर व वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांची एकदाच प्रतिक्षा यादी करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनास निर्देश

Next Post

खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Related Posts

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन
महाराष्ट्र

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

31 January 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कृषी

‘ना भीती, ना भय… नागनाथ महाराज की जय!’ | काका साठेंचा मार्डीत पायी प्रचार दौरा, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र

‘दादांच्या स्मृतीतून घड्याळाची हाक’ | काका साठेंचा घराघरात प्रचार, नान्नजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
Next Post
खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.