Sunday, July 20, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील

MH 13 News by MH 13 News
6 months ago
in महाराष्ट्र, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक
0
तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

MH13 NEWS NETWORK

सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय परिषदेचा समारोप

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांच्या समस्येवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून एका वेगळ्या विषयाला स्पर्श केले. त्यांच्या समस्येवर मंथन करण्याबरोबरच त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना दाखवत समाज जागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. याचा आदर्श राज्यातील इतर विद्यापीठांनी घेण्याबरोबरच माणूस म्हणून प्रत्येकानी तृतीयपंथीयांविषयी आपुलकीची भावना ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्या शमीबा पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शमीबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, कौशल्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शमीबा पाटील म्हणाल्या की, आज समाजात तृतीयपंथीयांविषयी दुजाभाव केला जातो. वास्तविक त्यांच्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. संघर्षमय जीवन जगताना त्यांच्या अनेक समस्या असतात. त्या सोडवण्याबरोबरच त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. तृतीयपंथी ऐवजी पारलिंगी हा शब्द वापरला पाहिजे. त्यांच्याविषयी गैरसमज व भेदभाव न करता माणुसकीची भावना ठेवून नेहमी मदत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल व ब्रिजमोहन फोफलीया यांच्या टीमने यशस्वीरित्या तृतीयपंथीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. अभ्यासक व संशोधकांनी यात शोधनिबंध सादर केले. प्रत्यक्ष तृतीयपंथी देखील यात सहभागी झाले. भविष्यकाळात देखील विद्यापीठाकडून तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र, शिक्षणाची सोय आदी उपक्रम राबविण्यात येईल, असे ही त्यांनी यावेळी सागितले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले.


सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शमीबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, कौशल्य विभागाचे सचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदी.

Previous Post

वसंत विहार गुलमोहोर सोसायटी येथे श्री गणेश जयंती निमित्त पाळणा सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न..

Next Post

ठाकरे गटाचा प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध ; हे आहे कारण..!

Related Posts

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
महाराष्ट्र

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

20 July 2025
डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे
महाराष्ट्र

डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे

20 July 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

20 July 2025
‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
धार्मिक

‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

19 July 2025
सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!
आरोग्य

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

18 July 2025
पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हेगारी जगात

पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली

18 July 2025
Next Post
ठाकरे गटाचा प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध ; हे आहे कारण..!

ठाकरे गटाचा प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध ; हे आहे कारण..!

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.