MH 13 News network
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या अकरा गुन्ह्यात एका वाहनासह देशी दारू व हातभट्टी दारू निर्मिती करीता लागणारे गुळ मिश्रित रसायन असा एकूण सहा लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात हातभट्टी निर्मिती अड्ड्यांवर छापे टाकले. या छापा कारवाईअंतर्गत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी जवान तानाजी काळे यांच्यासह जुनोनी ता. सांगोला गावाच्या हद्दीतील मोहितेवस्ती येथे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून 570 लिटर गुळ मिश्रित रसायन मिळून आल्याने ते जागीच नाश करण्यात आले. सदर ठिकाणी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 576 सीलबंद बाटल्या व विदेशी दारूच्या 48 बाटल्या आढळून आल्याने आरोपी आकाश सदाशिव मोहिते वय 19 वर्षे याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने कोंडेज ता. करमाळा येथे स्मशानभूमी जवळ जेऊर- वरफटणे रोड नजीक सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून 490 लिटर रसायन व चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली. दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने वांगी 3 ता. करमाळा या गावाचे हद्दीत स्मशानभूमीच्या समोर असलेल्या सरकारी ओढ्याच्या झुडपामध्ये व दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांच्या पथकाने लक्ष्मी टाकळी ता. पंढरपूर येथे सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रसायन जागीच नाश केले.
निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास गणपत तांडा ता. दक्षिण सोलापूर येथे विजय मानसिंग चव्हाण, वय 35 वर्षे या इसमाला दोन हजार पाचशे लिटर रसायनासह हातभट्टी ठिकाणावरून अटक केली. दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकाने वडजी तांडा हद्दीतील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून 3800 लिटर रसायन व एक हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH 12 LG 3115 जप्त केली.
दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने सिताराम तांडा व वडजी तांडा येथे सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून 4500 लिटर रसायन जागीच नाश केले. दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने धर्मपुरी ता. माळशिरस येथे सतीश रामचंद्र मसुगडे वय 37 वर्षे याच्या ताब्यातून सहाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले.
ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील , पंकज कुंभार, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, मानसी वाघ , सुखदेव सिद, सौरभ भोसले, श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, आवेज शेख, गजानन होळकर, जीवन मुंढे, जवान तानाजी काळे, विकास वडमिले, अशोक माळी,अण्णा करचे, अनिल पांढरे इस्माईल गोडीकट,प्रशांत इंगोले नंदकुमार वेळापुरे , विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत , गजानन जाधव, तानाजी जाधव, वाहनचालक रशीद शेख, मारुती जडगे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 475 गुन्ह्यात एक कोटी 51 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे