Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

MH13 News by MH13 News
8 months ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड
0
SHARES
168
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS Network

सोलापूर (प्रतिनिधी):सोलापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक २ च्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. १० मधील E ग्रुप विडी घरकुल, पोषम्मा चौक परिसरातील रहिवाशांनी दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी केल्यानंतर महापालिकेने तत्काळ कारवाई करत संपूर्ण प्रकरणाची इंडोस्कॉपी कॅमेऱ्याद्वारे सखोल तपासणी केली.

शंभो मारुती मंदिरासमोर पिण्याच्या पाण्यात गढूळपणा व दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मक्तेदार सगर यांच्या माध्यमातून इंडोस्कोपी तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान, पाण्याची पाइपलाइन आतून पूर्णतः गंजलेली असून गाठी निर्माण झाल्या आहेत, हे स्पष्ट झाले. याशिवाय पाइपलाइनच्या शेवटच्या ३ मीटर अंतरात ४ टॅप कनेक्शन पैकी २ कनेक्शन बंद, तर २ कनेक्शन कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.विशेष म्हणजे, एका कनेक्शनचा बेंड पूर्णतः कुजलेला होता व त्याच्या शेजारीच जुन्या ड्रेनेजचे घरगुती कनेक्शन असल्याने पाण्यात ड्रेनेज मिसळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या कुजलेल्या बेंडमधून ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमध्ये शिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पाणीपुरवठा निगेटिव्ह फिडींग पद्धतीने (Negative Feeding) होत असल्याने इंडोस्कोपी करताना ८ ते १२ मीटर पाइपलाइनमधील संपूर्ण भाग पाण्यात बुडालेला आढळून आला. त्याच ठिकाणी ४ इंची वॉशआऊट व्हॉल्व्ह बसवण्यात आले असून, सध्या तेथे सुधारणा प्रक्रिया सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील अशा दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागांमध्ये तात्काळ इंडोस्कोपी कॅमेऱ्याद्वारे तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जिथे जिथे पाइपलाइन जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे, तेथील पाइपलाइन बदलण्यासाठी आवश्यक तेवढा निधी प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

Next Post

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.