MH 13 News Network
पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलै ला वाढदिवसाच्या निमित्त महिला जिल्हा प्रमुख सौ. प्रिया आ. बसवंती यांच्या नेतृवात अक्कलकोट शहरात महिला आघाडी 5 शाखा चे भव्य थाटात उदघाटन व लोकापुरे मंगल कार्यालय येथे मोफत कॅन्सर व नेत्र तपासणी शिबीर आयोजित केल होत, महिला आरोग्य कडे दुर्लक्ष करतात. सद्या ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण वाढलं असून उशीरा निदान झालेमुळे अनेक कुटुंब विस्कळीत झाली, एकूण 5000 लोकांची तपासणी तर 2224 महिलांना मोफत चष्मा वाटप केल.
सौ. प्रिया आ. बसवंती यांनी या शिबिरात डोळ्याचे ऑपरेशन च्या रुग्णांना मोफत ऑपरेशन ची सोय केली असून 1 ऑगस्ट ला पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल येथे सुमारे 265 लोकांचे ऑपेरेशन करण्यात येईल.व कॅन्सर निदान झालेल्या महिलांचे मोफत उपचार करण्यात येत आहें.
या मोफत शिबीर चे उदघाटन शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या, सपंर्क प्रमुख सौ. संजना घाडी, उपनेत्या सौ. अस्मिता गायकवाड, उपनेत्या सौ.शीतल शेट देवरुखकर जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग, उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे,महिला तालुका प्रमुख सौ. अनुराधा शिवगुंडे, महिला शहर प्रमुख जयश्री ढेपे शहर प्रमुख संतोष केंगनाळकर, तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, किशोरी होटकर, सरोजनी शाली,रिहाना शेख उपस्थित होते. महिला आघाडीतील सर्व पदाधिकारी हसीना शेख,नूरजहाँ मुजावर, पुजा घोडके, नूरजहाँ नदाफ खातिजा मुजावर, सुवर्णा गवंडी, कल्पना कोरे, राजश्री कोल्हटी, आंबिका घोडके हसीना शेख, लक्ष्मी कांबळे, शहनाझं शेख, अनिता कांबळे, शमशाद शेख, ज्योती झिपरे, अक्षता सोनवणे, मोनाली भोकरे, समिना लुकडे, गीता म्हेत्रे, पार्वती इसापुरे, संगीता कांबळे, वर्षा पेठकर, मीनाक्षी आलुरे. शिबिरासाठी प्रचंड मेहनत घेतली.
बुधराणी हॉस्पिटल पुणे व नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी यांचे आभार.विशेष सहकार्य शिवआरोग्य सेना जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे व टीम. अक्कलकोट मधील नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसादा बद्दल खूप खूप आभार.