महेश हणमे / 9890440480
कधी चार कधी पाच दिवसातून एकदा आणि कमी वेळ मिळणारे पिण्याचे पाणी ही सोलापूरकरांची मोठी समस्या आहे. पाण्याचा दिवस हा शब्दप्रयोग केवळ सोलापुरसाठीच वापरला जातो असे म्हणले जाते..! मात्र सोलापूरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याची खात्री आता निर्माण झाली आहे..!याला कारण म्हणजे..! नूतन आमदार देवेंद्र कोठे यांच्या पहिल्याच प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे. कोट्यावधीचा निधी मंजूर झाल्याचा शासन निर्णय आज गुरुवारी झाला.
सोलापूरवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार!
नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनी कार्यक्रमात बोलताना आमदार कोठे यांनी उजनी -सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या उर्वरित कामाच्या पूर्ततेसाठी लागणारा 90 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच देतील असा विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास केवळ चार दिवसातच सत्यात उतरला आहे.
आज 89.29 कोटी रुपयांचा निधी वितरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सदर निधी हा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधीमधून मिळणार आहे.
नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा अशा सूचना नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाची बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या.
त्यामध्ये सोलापूर स्मार्ट सिटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या निधीसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या.
त्याची अंमलबजावणी आज गुरुवारी 9 जानेवारी रोजी झाली.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत सोलापूर स्मार्ट सिटी पाणी पुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे.
अशाच मुत्सद्दी नेत्याची गरज..!
सोलापूरसाठी भांडणाऱ्या आणि नेमकेपणाने मुद्दे मांडणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची सोलापूरला गरज होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संधी नसताना देखील औचित्याचा मुद्दा मांडत सोलापूरकरांचा पाणी प्रश्न नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला. शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून अल्पावधीतच ही मागणी त्यांनी मंजूर करून घेतली. प्रबळ इच्छाशक्ती असणारा हा नेता शहराला विकासाच्या मार्गावर गतिमान करू शकतो, हा विश्वास सार्थ ठरला असून भविष्यात सुद्धा अशाच तळमळीने सोलापूरचे प्रश्न सोडवाल हीच अपेक्षा आहे.
गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी नगरसेवक ( एक सोलापूरकर)
केवळ माझेच नाही तर सोलापूरचे पालकत्व..!
मुख्यमंत्री देवेंद्रजी हे माझे पालक असून त्यांनी पाण्यासाठी इतका मोठा निधी तात्काळ मंजूर करून सोलापूरचे ही पालकत्व घेतले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.पाणी पुरवठा योजनेचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे मी सोलापूरकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. अक्कलकोटचे आमदार आणि माझे मार्गदर्शक सचिन दादा यांचे मोठे सहकार्य पाणी प्रश्न दूर करण्यासाठी मिळाले हे उल्लेखनीय आहे. भविष्यातही सोलापूरच्या सेवेसाठी 24 तास कार्यरत असण्याची ग्वाही आजच्या क्षणी देतो.
श्री.देवेंद्र कोठे, नूतन आमदार
विशेष म्हणजे अध्यात्मिक वृत्तीचे आमदार देवेंद्र कोठे यांचा आज मौनवार असतो.त्यांनी मेसेज करून आपली प्रतिक्रिया एम एच 13 न्यूज ला दिली आहे.