उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘ईद-उल-अधा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, शांती, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. तसेच, समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो. हा सण समाजातील गोरगरीब, वंचित, उपेक्षितांच्या कल्याणाचाही संदेश देतो. यानिमित्ताने सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या परोपकारी, उदात्त मूल्यांच्या जपणुकीचा आपण सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.