मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल-अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘राज्यातील सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद मुबारक! ईद अल-अधा हा सण त्याग, करुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो. या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करुन एक उत्तम व सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा संकल्प करुया’, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.