Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘त्या ‘ वृद्धेच्या खूनप्रकरणी हायकोर्टाचा जामीन ; अ‍ॅड. रितेश थोबडे यांचा ठोस युक्तिवाद..

MH13 News by MH13 News
10 months ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक
0
‘त्या ‘ वृद्धेच्या खूनप्रकरणी  हायकोर्टाचा जामीन ; अ‍ॅड. रितेश थोबडे यांचा ठोस युक्तिवाद..
0
SHARES
66
VIEWS
ShareShareShare

MH 13 News network

सोलापूर, दि. ७ —आरबळी (ता. मोहोळ) येथे ७४ वर्षीय सिंधुबाई हरिबा घाडगे यांच्या खूनप्रकरणी अटक झालेल्या गणेश मारुती माने (वय ३२, रा. उंब्रज, ता. इंडी, जि. विजापूर) यास कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती श्री. शिवकुमार दिघे यांनी ₹२०,००० च्या जातमुचलक्यावर जामिनाचा आदेश दिला.

🔹 प्रकरणाचा तपशील:

गणेश माने व विष्णू भोसले यांनी संगनमत करून वाघोळी येथील बंद घराची घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान आरबळी–बेगमपूर कच्च्या रस्त्यालगत असलेल्या घरात एकटी राहणाऱ्या सिंधुबाई घाडगे यांचा प्रतिकार होताच त्यांचा कोयत्याने खून करून, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याचा आरोप आहे. चोरीचा माल घेऊन आरोपी फरार झाले व वापरलेले हत्यार भीमा नदीत फेकून दिल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

या प्रकरणाची फिर्याद मृत महिलेच्या जावयाने परमेश्वर तुकाराम कलुबुरमे यांनी कामती पोलिस ठाण्यात दिली होती.

🔹 जामिनासाठी न्यायालयीन लढा:

जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आरोपी गणेश माने याने अ‍ॅड. रितेश थोबडे यांच्या माध्यमातून कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.

सुनावणीदरम्यान अ‍ॅड. रितेश थोबडे यांनी ठोस युक्तिवाद मांडला की, “सदर गुन्हा हा पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून, आरोपीविरुद्ध कोणताही थेट पुरावा नाही.”या मुद्द्याचा स्वीकार करत न्यायालयाने जामीन मंजूर केला.

🔹 खटल्यातील वकिलांची बाजू:

या प्रकरणात आरोपीतर्फे अ‍ॅड. रितेश थोबडे व अ‍ॅड. किरण सराटे यांनी तर सरकारतर्फे अ‍ॅड. एस. एच. यादव यांनी काम पाहिले.

Tags: Adv Ritesh thobadeKolhapursolapurSolapur Maharashtra
Previous Post

पत्नीची छेडछाडचा वाद ; खुनाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता..

Next Post

‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur

'जावया'वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.