Saturday, October 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिल्ह्यातील प्रत्येक घरावर दिमाखात राष्ट्रध्वज फडकवा 

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
जिल्ह्यातील प्रत्येक घरावर दिमाखात राष्ट्रध्वज फडकवा 
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

ध्वजारोहण करून ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रारंभ

चंद्रपूर, दि. 13 : जिल्ह्यातील प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियान चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी करावे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे होणार आहे. या निमित्ताने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले आणि अभियानाचा शुभारंभ केला.

ध्वजारोहणानंतर श्री. मुनगंटीवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा… हर मन तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे. ‘देशभक्ती ना हो क्षणिक उबाल… मन में पले वह पूरे साल’ अशी त्यामागची भावना आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देशाच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करताना विकासात योगदान द्यायचे आहे, असा संकल्प प्रत्येकाने करावा.’

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात अभियान सुरू झाले आहे. तिरंगा यात्रा मनामनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. तिरंगा आपल्यासाठी प्राणप्रिय आहे. देशाची शान आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नाही. भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत देशासाठी आपले प्राण अर्पण केले. स्वतः च्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. अशा वीर शहिदांचे स्मरण करूया, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Previous Post

महाराष्ट्रातील ‘अहिल्याभवन’ संपूर्ण देशात आदर्श ठरेल

Next Post

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

Related Posts

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
Next Post
प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.