MH 13News Network
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका आणि निकाल प्रमाणे पुन्हा जरांगे पॅटर्न बनणार का अशी चर्चा होत आहे.
जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आपला कार्य अहवाल, बायोडाटा, समाजकार्य , सर्वसामान्य वंचित घटकाविषयी केलेले कार्य, आरक्षण आंदोलनातील योगदान, राजकीय,सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आदींची माहिती घेऊन सोलापुरात मेळाव्यासाठी यावे असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले असून येत्या शनिवारी 19 तारखेला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी प्रशाला येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात अनेक जण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अकरा विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मीय, सर्वजातीच्या उमेदवारांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे.
स्थळ- राजर्षी शाहू महाराज सभागृह, छ. शिवाजी प्रशाला,प्रभात थिएटर समोर सोलापूर
वार – शनिवार दिनांक – १९/१०/२४
वेळ- सकाळी 11 वाजता