जैन गुरुकुलला ‘संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा’ पुरस्कार जाहीर
सोलापूर:- श्री.ऐ.प.दि.जैन पाठशाळा,सोलापूर संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेने ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ या अभियानात तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ‘संत सोपान काका स्वच्छ व सुंदर शाळा’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त,आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या संकल्पनेतून व संत सोपानकाका सहकारी बँक मर्या. सासवड तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या अभियानात आरोग्य,स्वच्छता, पर्यावरण,गुणवत्ता व भौतिक सुविधा आदी निकषांवर शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यांकनात जैन गुरुकुल प्रशालेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांची सकारात्मक दखल घेण्यात आली.
प्रशालेस जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ.रणजित गांधी व सर्व विश्वस्त यांनी मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रविण कस्तुरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
केले.#SchoolAchievement #SantSopanKaka #JainGurukul #Solapur #SwachhSchool #Pride