Wednesday, August 27, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

MH13 News by MH13 News
2 months ago
in आरोग्य, गुन्हेगारी जगात, सामाजिक
0
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!
0
SHARES
1.2k
VIEWS
ShareShareShare

मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोटवर संशय

सोलापूर | प्रतिनिधी

ज्येष्ठ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती जयदीप मोहिते यांनी सदर निर्णय देताना या प्रकरणातील अनेक बाबींवर संशय व्यक्त झाला असल्याचे अधोरेखित केले.

दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी मनीषा माने हिने डॉक्टर वळसंगकर, त्यांची पत्नी उमा वळसंगकर आणि इतर दोघांना ई-मेलद्वारे काही आरोप केले होते. त्यानंतर माफीनामाही सादर करण्यात आला. मात्र 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचा मुलगा अश्विन वळसंगकर याने बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

जामीन अर्जात मांडण्यात आलेले मुद्दे –

ई-मेलमध्ये घाणेरडे आरोप नव्हते, केवळ एका कर्मचाऱ्याने मालकाकडे दाद मागितली होती.

ई-मेलनंतर माफीनामा दिला गेला आणि तो विषय तिथेच संपला होता.

सुसाईड नोट दुसऱ्या दिवशीच जप्त करण्यात आली, जी बाब संशयास्पद असल्याचे सांगितले.

डॉक्टरांनी 2001 नंतर मराठीत लिखाण केले नव्हते, तरीही सुसाईड नोट मराठीत..

हेही एक संशयाचं कारण.

दोषारोपपत्रात 44 साक्षीदार असून बहुतांश कर्मचारी वर्ग आहे, मात्र आत्महत्येशी थेट संबंध स्पष्ट नाही

.सी.सी.टी.व्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स सादर न केल्याने तपास अपूर्ण असल्याचे प्रतिपादन

.“या संपूर्ण प्रकरणात खरा गुन्हेगार सुटला असून, मनीषा मानेला बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे,” असा ठपका आरोपीच्या वकिलांकडून ठेवण्यात आला.

या प्रकरणात मनीषा माने हिच्या वतीने ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक व ॲड. सिद्धाराम पाटील यांनी बाजू मांडली. तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.

शहरात वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या डॉक्टराच्या आत्महत्येचा गुंता आणखी खोलात जात असल्याचे या निकालावरून दिसून येते. पुढील सुनावणी दरम्यान या प्रकरणाला कोणती कलाटणी मिळते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

Next Post

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.