MH 13News Network
मोहोळ /प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा ,गाव भेटी व संवाद बैठका राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
निपाणी हिंगणी येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात ग्रामस्थांनी संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी राजकीय नेते मंडळी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काम करत आहेत. परंतु ते या दृष्ट चालीमध्ये यशस्वी झाले नाहीत. सर्व समाज हा एकच आहे ही भावना निर्माण करण्यासाठी या संवाद बैठका आयोजित केल्या जात असून सद्यस्थितीत केवळ अडीच एकरचा माणूस राज्याची दिशा ठरवत असल्याचे मत ॲड. श्रीरंग लाळे यांनी मांडले.
मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी आपल्या भाषणात अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे मिळणारे लाभ, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाची होणारी प्रगती यावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशी बाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. आरक्षणासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
या गावातील ग्रामस्थ ओबीसी समाजातील युवक बालाजी गडदे यांनी मराठा समाजाचे शंभर ते दीडशे आमदार असून सुद्धा ते न्याय देऊ शकत नाहीत. आरक्षणाला मराठा नेतेमंडळीच विरोध करत आहेत. मात्र गाव पातळीवर आम्ही सर्व समाज बांधव एकत्र आहोत असे सांगितले.
या संवाद बैठकीत देविदास अंबादास गायकवाड, दिनेश गायकवाड, राजकुमार गायकवाड, घनश्याम झेंडगे संजय ताकमोगे, रामदास थिटे भारत वाघमारे, हनुमंत शिरसाट,विठ्ठल झेंडगे, बालाजी गडदे,नागनाथ झेंडगे, संजय कसबे,गणेश खंडाळकर, पांडुरंग झेंडगे,नागनाथ लवटे, डॉ. गणेश झेंडगे, गणेश थिटे, विजय थिटे, आबा माळी, गिरीश कसबे यांच्यासह मराठा समाज बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.