MH 13News Network
सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आले असता,सिद्धेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी महाजन आले असता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी व नगरसेवकांनी खऱ्या दलित उमेदवारास सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी ही एकमुखी मागणी केली.
याप्रसंगी बोलताना पदाधिकारी म्हणाले की,सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार हा प्रशासकीय व संघटनात्मक कामांचा अनुभव असलेला असावा,कारण ही निवडणूक देशपातळीवरील निवडणूक असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत याकरिता मोदी दूत आम्हास हवा असून तो स्थानिक नसला तरी चालेल मात्र सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असणारा असला पाहिजे अशी मागणी केली
याप्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील,प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे,अनुसूचित मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने,भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, OBC मोर्चा प्रदेश पदाधिकारी यतीराज होनमाने,प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सागर अतनुरे, दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष युवा मोर्चा डोंगरेश चाबुकस्वार, अर्जुन मोहिते,केदार कांबळे,संजय बनसोडे,शुभम गायकवाड, विशाल बनसोडे व पदाधिकारी उपस्थित होते