MH 13 News Network
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, सरचिटणीस विनय रायकर यांनी मनपा शाळा क्र 2 येथे सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात वाढदिवसाच्या दिवसाला , वाढदिवसाच्या दिवसाला , लाभावे दीर्घायु… लाभावे दीर्घायु…अहो दादाजी हॅप्पी बर्थडे टू यु ….अहो.. दादाजी हॅप्पी बर्थडे टु यु अशा जल्लोषात अजित दादा यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, उपाध्यक्ष सुजित अवघडे,सरचिटणीस विनय रायकर, सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे,शाळेच्या मुख्याध्यापिकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .