MH 13News Network
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे घड्याळ चिन्ह आणि पक्ष ताब्यात मिळाला असल्याने आता वेळ आमचीच असा विश्वास आणि चंग पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. सोलापूर शहरातील राष्ट्रवादीच्या संघटन कार्याला वेग आलेला दिसून येतोय.
शहराच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या राष्ट्रवादीच्या घडामोडींचा आढावा..
राष्ट्रवादी पक्ष बळकटीसाठी सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर -जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान या जोड गोळीने बांधलेला दिसून येतोय. सोशल इंजिनिअरिंगचे तंत्र परफेक्ट जमवल्याचे विविध फ्रंट सेल आणि आघाड्यांवर केलेल्या नियुक्त्यावरून दिसून येते.
राष्ट्रवादीचे सोशल इंजिनिअरिंग..

कधीकाळी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. भाजपाने हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात मिळवण्यात यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्या राज्यातील सत्तेमध्ये भागीदार आहे. अजित पवार हे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडत असून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये चैतन्य पसरवण्याचे काम अजित दादांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील टीम करत आहे.
चातुर्यपूर्ण आणि खडे बोल अशी शैली असलेल्या उमेश पाटलांना मुख्य प्रवक्तेपद मिळाले असून दीपक (आबा )साळुंखे यांना जिल्ह्याचे पद मिळाले. महापालिकेतील माजी गटनेते किसन जाधव यांना प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाले असून पक्ष वाढीसाठी सगळेजण आपली ताकद वापरताना दिसून येतय.
अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी अमीर शेख, कार्याध्यक्षपदी रियाज शेख, समन्वयक पदी संजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम समाजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रामुख्याने सर्वच घटकापर्यंत पोहोचण्याचा आपला माणूस आहे विविध विकास कामासाठी भरगच्च असा निधी देऊ असे अजित दादांनी तेव्हा जाहीर केले होते विरोधकांना टीका करू द्या आपण त्यांना कामातून उत्तर देऊ असेही अजित पवार म्हणाले होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पहिल्याच महिला मेळाव्यासाठी सोलापुरातून महिला पदाधिकाऱ्यांची फौज मुंबईमध्ये गेली होती. राज्य महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला होता.
या मेळाव्यात सोलापुरातील संगीता जोगधनकर, सायरा शेख, लता ढेरे ,शशिकला कस्पटे, चित्रा कदम, प्राजक्ता बागल, कविता पाटील ,किरण मोहिते, मोहिनी सरकार यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
मुंबईतील कार्यक्रमांमध्ये सुनील तटकरे यांचा सत्कार शशिकला कस्पटे ,चित्रा कदम तर प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार लता ढेरे आणि छगन भुजबळ यांचा सत्कार सायरा शेख या सोलापुरातील महिला प्रमुखांनी केला होता. यामुळे महिला आघाडीमध्ये मोठे चैतन्य पसरले होते.


राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी याआधीही शहरांमध्ये विविध फ्रंट व सेलवर युवक- युवती ,महिला यांची तगडी फळी निर्माण केलेली होती. त्यामुळे अजित पवार गटाचे जिल्ह्यातील नेतृत्व स्वीकारल्यानंतर संघटन कौशल्य असलेल्या संतोष पवार यांना हे काम जड गेलेले दिसत नाही.
नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी संगीता जोगदनकर आणि कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची निवड करण्यात आलेली आहे. याआधी जोगधनकर यांनी सरचिटणीस तर चित्रा कदम अनेक वर्ष शहर सचिव या पदावर सक्रिय कार्यरत होत्या.


युवकांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर विद्यार्थी अध्यक्षपदी पवनकुमार पाटील यांची शिफारस वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली होती.अशी माहिती संतोष पवारांनी दिली .त्यानुसार युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी पवनकुमार पाटलांची निवड झाल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव सामाजिक न्याय अध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरु, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, सोशल मीडीया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे हे सध्याला राष्ट्रवादीसाठी जोमात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले जाईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतो.
नुकतीच विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गी लावण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी एका युवकाची शिफारस संतोष पवार यांनी वरिष्ठांना केली होती. त्यानुसार दत्ता वाघमोडे यांची निवड घोषित करण्यात आली.

राष्ट्रवादी विद्यार्थी कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमोडे यांची निवडीचे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी युवक निरीक्षक संग्राम सिंह पाटील युवक अध्यक्ष सुहास कदम युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख युवक कार्याध्यक्ष संतोष जक्का, दत्तात्रय बडगंची साजिद पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी भवन उद्घाटनाच्या वेळीसुद्धा सोशल इंजिनिअरिंगचा इफेक्ट दिसून आला. माजी आमदार रविकांत पाटील, लोणारी समाजाचे नेते बिज्जू प्रधाने ,गुरव समाजाचे नेते किशोर पाटील,माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, मागासवर्गीय समाजाचे नेते नागनाथ क्षीरसागर,तांबे यांच्यासह विविध जाती धर्मातील नेते आणि कार्यकर्ते मंडळींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
महापालिकेतील आक्रमक आणि अभ्यासू चेहरा अशी ओळख असणारे दलित समाजातील नेते आनंद चंदनशिवे यांचाही त्यांचे सहकारी गणेश पुजारी यांच्या समवेत अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चंदनशिवे यांनी प्रवेश केला असल्याची माहिती मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आणि जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांनी प्रसार माध्यमांना दिलेली होती.