MH 13 NEWS NETWORK
आचार्यश्री विद्यासागर जी हे वात्सल्यमयी संत होते. त्यांनी वालचंद शिक्षण समूहाला अनेक वेळा संबोधित केले होते. शिरपूर चातुर्मास प्रसंगी शेकडो विद्यार्थी व संस्थेचे विश्वस्त तसेच शिक्षक वर्गांनी त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला होता.’ असे विनयांजली सभेच्या निमित्ताने वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी आचार्यश्रींच्या त्यागपूर्ण जीवन शैलीचा पुनरुच्चार केला. आचार्य श्रींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थी व प्राध्यापकांनी मौन साधना केली.
‘संतशिरोमणी श्रमण दिगंबर जैन आचार्यश्री विद्यासागर मुनिराज अत्यंत प्रभावक कठोर तपस्वी आचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. आचार्यश्रींनी आपल्या तपस्वी जीवनात संपूर्ण भारतभर अहिंसेची पताका फडकविली. आचार्यश्री करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जातात. त्यांच्या समाधीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी केलेल्या साधनेचे अनुकरण करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.’ असे बोलून महाविद्यालयाच्या महावीर स्टडी सेंटरचे प्रमुख प्रो. महावीर शास्त्री यांनी आचार्यश्रींच्या पावन स्मृतीला उजाळा दिला.